राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठे व्यक्तव्य केलं आहे. वळसे पाटलांनी थेट तिसरी आघाडीचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.
याबाबत वळसे पाटील शिरूरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, आमचं राज्यात सरकारला पाहीजे, परंतु केंद्रातल सरकार देखील सरकारला हवंय , त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्याना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याच प्रयत्न करत आहे.’
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘वयाच्या 80 पार केल्यानंतरही तो माणूस थांबायला तयार नाही. दररोज कुठेना कुठे तरी दौरा आहे. ऊन , वारा , पावसाची परवा न करता रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून फिरत असतो शरद पवार साहेब लोकांसाठी काहींना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
तर दुसरीकडे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस ‘मुंबई स्वतंत्र करू’ म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. याबाबत ठाकरे म्हणाले, ‘मुंबईला तोडण्याचा यांचा मनसुबा वेळेत लक्षात घ्या. हे पोटातलं ओठात आलेलं वाक्य आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना घेरले.
मात्र तुमच्या मालकांसह १७ पिढय़ा खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. त्याला आता स्वतः गृहमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या राज्यात कारवाया सुरू आहेत, त्यावरून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न दिसतोय,” असा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दालनात घुसून राडा घालताच सदाभाऊंची सपशेल शरणागती; यू टर्न घेत म्हणाले..
‘.. तुमची नैतिकता कुठे होती? तेव्हा तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं..
काय सांगता? ‘या’ ५ क्रिकेटपटूंनी केली नाही समाजाची पर्वा, केलं थेट घटस्फोटित महिलांशी लग्न
‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार साऊथच्या चित्रपटात, बऱ्याच काळानंतर करतेय कमबॅक