dhananjay munde : राज्यात शिंदे – फडणवीस हे नवं सरकार स्थापन झालं खरं..! मात्र सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होतं आहे. शिंदे सरकारमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. सुरुवातील फडणवीस उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नव्हते, असं देखील बोललं जातं आहे.
याचवरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे धनंजय मुंडे यांनी देखील भाजपला लक्ष केलं आहे. सोबतच अप्रत्यक्षरित्या मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘भाजपकडे १२० आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद मिळाले,’ असं मुंडे यांनी म्हंटलं आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच कामाला लागले आहेत. विरोधकांच्या गोटात सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याचबरोबर नेते मंडळी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज विरोधी पक्षनेते अजित पवार बीज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते.
यावेळी मुंडे यांनी थेट शिंदे सरकारला देखील लक्ष केलं. सोबतच फडणवीसांना आणि भाजपला लक्ष करताना मुंडे यांनी म्हंटलं आहे की, ‘१२० आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागले. मग नवे सरकार आणून यांना काय फायदा झाला?,’ असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पुढे बोलताना मुंडे यांनी अजितदादांचे तोंड भरून कौतुक केले. अजितदादांचे कौतुक करताना मुंडे यांनी म्हंटलं की, ‘करोना काळात सकाळी सात वाजल्यापासून ते उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष देत होते. त्यांच्यासारख्या नेत्याच्या हाताखाली काम केल्याचा अभिमान वाटतो.’
सध्या सत्ताधारी – विरोधकांमद्धे शाब्दिक युद्ध सुरू आहे. विरोधकांकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. अजित पवार सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आगामी निवडणुकांच्या रणनीती सध्या विरोधक आखत आहेत. त्याचसोबत विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत कपडण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Chandrakant Khaire : “आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता “
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार