Share

NCP : ‘पंचायत समिती सांभाळता न येणार्‍यांनी बारामती जिंकण्याची भाषा करू नये’; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले

sharad pawar & devendra fadanvis

ncp leader angry on bjp leaders |  बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने धडपड सुरु केली आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे या मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण अशातच भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहे. पण भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात भाजपच्या हाती काहीच लागलेले नाही. १३ पैकी एकही जागा भाजपला जिंकता आलेली नाही.

नागपूरच्या निवडणूकीत पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. हा पराभव झाल्यानंतर विरोधकही त्यांना सुनावताना दिसत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या वल्गना करणार्‍यांनी आधी नागपूर जिल्ह्यातील पंचायत समित्या सांभाळाव्या. पंचायत समिती सांभाळता न येणार्‍यांनी बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करू नये. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे दिवा स्वप्न पाहू नये, असे ट्विट रविकांत वरपे यांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकलेला नाही.तर फक्त दोनच ठिकाणी उपसभापती होऊ शकले आहे. तसेच १३ मध्ये ९ पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती निवडून आलेले आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, भाजपकडून मिशन बारामतीची तयारी जोरदार सुरु आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचे प्लॅनिंग सुरु केली आहे. भाजपला बारामती मतदार संघात कठीण आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सलग तीनवेळा या मतदार संघातून निवडून आल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sharad Pawar : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणणाऱ्या पवारांना भाजपने दिलं उत्तर; म्हणाले उद्धवजींची लाज…
Jitendra joshi : ‘दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होतं त्यामुळे…’; अभिनेता जितेंद्र जोशीचा चाहत्यांना मोलाचा संदेश
Andheri election : आता शिंदेगटही राज ठाकरेंच्या साथीला; पत्र लिहून भाजपकडे केली ‘ही’ मागणी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now