politics : महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला आहे. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मात्र त्याआधी भाजपच्या नेत्यांनी आपल्याला सर्वाधिक जागा मिळाल्याचे म्हंटले होते.
शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ६०८ ग्रामपंचायतिंच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यामध्ये १७३ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. १६८ जागा भाजपला तर काँग्रेसला ८४ जागांवर विजय मिळाला आहे.
यावरून महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे स्पष्ट होते. भाजप आणि शिंदे गटाला मिळून २१० जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या? हे स्पष्ट सांगता येत नाही, असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाने सर्वाधिक ठिकाणी विजयी प्राप्त केला, असं म्हणत शरद पवारांनी भाजप नेत्यांचा दावा खोडून काढला आहे.
पत्रकारांनी मात्र ज्यावेळी भाजप सर्वाधिक जागा मिळवण्याचा दावा करते आहे. याबद्दल तुमचे काय मत? अशी विचारणा केली. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे जी अधिकृत माहिती आली आहे. त्यानुसार मी आपल्याला सांगितले. मात्र काही लोकांना सर्वाधिक जागा आपल्यालाच मिळाल्या. अशा आनंदात राहायचे असेल तर राहू द्या, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
जुन्नर, आंबेगाव भागात राष्ट्रवादीला चांगलेच यश मिळाले. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये सुद्धा ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा चांगला प्रभाव आढळून येतो. आता शरद पवारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
ग्रामपंचायतीच्या लागलेल्या निकालाची इतर जिल्ह्यांमधून मी माहिती गोळा केली, असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. शरद पवार हे मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपकडून यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
शशी थरूर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, सोनिया गांधींनी दिले संकेत, म्हणाल्या, हा त्यांचा…
250 हून अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीकडे उपचारासाठी नाहीत पैसै, लोकांना मागितली मदत
जम्मू-काश्मिरमध्ये इम्रान हाश्मीवर दगडफेक, बाजारात फिरताना घडलं असं काही.., वाचा सविस्तर