Share

ncp : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या मनोजला राष्ट्रवादीने केलं मालामाल, देणार ५१ हजारांचं बक्षीस

chandrakant patil sharad pawar

ncp gift to those guy who throw in on chandrakant patil  | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

अशात एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला राष्ट्रवादीकडून आधीच ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता १४ लोकांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे आधीच राज्यात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे या विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला होता.

तसेच या मोर्च्यावेळी त्यांनी जो कोणी चंद्रकांत पाटलांना काळं फासेल त्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता ते भाष्य करणाऱ्या ऋषिकेश गायकवाड यांच्यासोबतच १४ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज बरकडेने शाईफेक केली होती. त्यानंतर शाईफेक करणाऱ्या मनोजला लवकरच पैसे दिले जातील याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यामुळे आता बारामती पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून १४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील खुपच संतापलेले दिसत आहे. हा सर्व प्रिप्लॅन होता. कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केलं आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी विरोक्षी पक्षातील नेत्यांना या शाईफेकीचा निषेध करुन दाखवा, असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
एका चौकात मुलींची छेड काढणाऱ्यांना पुढच्या चौकात जाईपर्यंत गोळ्या घातल्या जातील – योगींचे आदेश
‘आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद हवा आहे’; केजरीवाल मोदींशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत
Ajit pawar : तेव्हा खूप बोलत होते आता एसटीचे सरकारमध्ये विलीणीकरण करण्यास कुणी रोखलय? अजित पवारांचा सवाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now