Share

‘बंडातात्यांच्या तोंडाला काळं फासणार, पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही’

bandatatya karadkar

गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल देखील वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला. अनेक राजकीय नेत्यांनी कराकडकरांवर शाब्दिक निशाणा साधला आहे.

तसेच सोलापर आणि पंढरपूर राष्ट्रवादी युवती काँग्रेसने देखील याबाबत भाष्य केले आहे. ‘महिलांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या ह.भ.प. बंडातात्या कराकडकर यांची वारकरी संप्रदायातून वारकऱ्यांनी हकालपट्टी करावी. कराडकर यांना पंढरीत पाऊल ठेवू देणार नाही, असे तयांनी म्हंटले आहे.

याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांना एक निवेदन दिले आहे. ‘बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. कराडकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

तर अखेर बंडातात्या कराडकर यांना माफी मागावी लागली. वाईन धोरणाविरोधात बोलताना कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच वादात सापडले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग निर्माण झालं आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांना अखेर माफी मागावी लागली.

माफी मागताना कराडकर म्हटले की, ‘ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये,’ असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आईच्या आठवणीत भावूक झाला अर्जुन कपूर; म्हणाला, ‘मी तुझ्याशिवाय अपुर्ण आहे, लव्ह यू’
३ वर्षापुर्वीची खुन्नस? शिवसेना नेत्याच्या हत्येचे गूढ उकलले; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर
अरे बापरे! भारतात सापडली सोन्याची सर्वात मोठी खाण, निघणार टनावारी सोने
माणुसकीला काळीमा! मंदिरात नारळ फोडला म्हणून गावकऱ्यांनी कुटुंबासोबत केलं ‘हे’ कृत्य, वाचून धक्का बसेल

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now