शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना ही फुट पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात राष्ट्रवादीच्या एका बड्या आमदाराच्या पोस्टने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरु करेल ना, त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे माननीय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची राजकारणापलिकडची मैत्री, असं का फेसबूक पोस्टमधून म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंना टॅग केलं आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचे स्पष्टपणे संकेत दिल्याचीही चर्चा होत आहे. तसेच काहीतरी नवीन सुरु करु तर चर्चा तर होणारच ना, असे म्हणत राष्ट्रवादीला एक सूचक इशारा दिल्याचेही म्हटले जात आहे.
अण्णा बनसोडे हे शिंदे गटात जाणार हे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. पण ते कधी जाणार याबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच त्यांच्यासोबत कोण जाणार हेही अजून स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक जाण्याची शक्यता आहे.
अण्णा बनसोडे यांनी एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये जणांसाठी राब राबतो असे गाणे लावलेले आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतूक करणारा आहे. त्यामुळे बनसोडे हे राष्ट्रवादीला नक्कीच मोठा धक्का देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्क्यावर धक्के! अदानी एंटरप्राईझेसची अमेरिकन शेअर मार्केटमधून हकालपट्टी
शरद पवारांनी ‘तो’ चुकीचा निर्णय घेतला नसता तर आमची सत्ता गेलीच नसती; अजित पवारांची खदखद आली बाहेर
सारा तेंडूलकर की सारा अली खान? शुभमनच्या अफेअरचे रहस्य उलगडलं, थेट दोघांचा फोटो आला समोर