राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता २००४ च्या विधानसभा निवडणूकीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकप्रकारे असे बोलून दाखवले आहे की, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतलेला निर्णय चुकलेला आहे.
२००४ साली चालून आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी दवडल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे १९ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने नाकारलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु झालं आहे. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं का? अशीही चर्चा रंगली आहे.
२००४ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला राज्यात सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या होत्या. पण तरीही त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं होतं. सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही.
आता अजित पवार यांना २००४ च्या विधानसभा निवडणूकीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे. २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चुक होती, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
तसेच मुख्यमंत्रिपद घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं असतं तर सत्तेत आम्हीच राहायलो असतो, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी २००४ च्या निवडणूकीवर भाष्य केलं आहे.
२००४ साली विधानसभा निवडणूक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९, शिवसेनेला ६२ आणि भाजपला ५६ जागा मिळाल्या होत्या. असे असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
फक्त अदानीच नाही तर जगातील ‘या’ सहा गर्भश्रीमंत लोकांची संपत्तीही झपाट्याने होतेय कमी, पहा यादी
मृत्यूला चकवा देऊन अक्षरश मरणाच्या दाढेतून परत आले गौतमी अदानी; वाचा थरारक किस्सा
निवडणुकीचा निकाल सुरू असताना सुधीर तांबे स्मशानभूमीत, सत्यजितच्या विजयापेक्षाही मानसचा अंत्यविधी महत्वाचा