Share

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दालनात घुसून राडा घालताच सदाभाऊंची सपशेल शरणागती; यू टर्न घेत म्हणाले..

sdabhau khota

अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. मात्र रयत क्रांती संघटनेनं केतकीला समर्थन दिले. सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं.

खोत यांनी समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून थेट राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. सदाभाऊ खोत सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. अन् सोलापूरमध्येच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून आंदोलन केले. याच दरम्यान, खोत यांनी युटर्न घेतला. ‘आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

वाचा केतकीचे समर्थन करताना काय म्हंटलं होतं सदाभाऊ खोत यांनी… सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले होते. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं होतं.

‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला घेरले होते.

दरम्यान, ‘मला केतकीचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा,’ असं खोत यांनी म्हंटलं होतं. अखेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होताच खोत यांनी आपले विधान मागे घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मृत्यूनंतर तब्बल ‘एवढी’ संपत्ती कुटुंबासाठी मागे सोडून गेले यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा, वाचून अवाक व्हाल
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
 4 भारतीय क्रिकेटपटूंनी केलंय दोनदा लग्न, 66 वर्षीय दिग्गजाचाही समावेश, वाचून अवाक व्हा
भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूने ६६ व्या वर्षी केले दुसरे लग्न; नवरीचे वय ऐकून धक्का बसेल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now