सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतरच या वादाला सुरुवात झाली आहे. (nayan markan video viral)
मशिदींवरील भोंगे लवकरात लवकर खाली उतरवा असे असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या मागणीचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पसरल्याचे पाहायला मिळाले. अनेक राज्यात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याची मागणी जोर धरताना दिसून आली.
राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजप पाठिंबा देताना दिसून येत आहे. तसेच इतर काही नेतेही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसून येत आहे. आता सध्या एका १६ वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या मुलाचे नाव नयन मारकन असे आहे. तो राज ठाकरेंना पुर्ण पाठिंबा देत असून त्याचा व्हिडिओ मनसेच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मी राज ठाकरेंच्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा देतो. मशिद असो वा मंदिर कुठेही भोंगे लागले नाही पाहिजे. भोंगे जरी लागले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. त्या मर्यादेनुसारच सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. असे तो मुलगा म्हणताना दिसून येत आहे.
https://www.facebook.com/watch/?v=514392530344025&extid=NS-UNK-UNK-UNK-IOS_GK0T-GK1C&ref=sharing
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हनुमान चालिसेला का घाबरतो? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, शिवसेना ही तीच पार्टी आहे ज्यांचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी ९० च्या दशाकात बाबरी पाडण्यात शिवसेनाच्या कार्यकर्त्यांचाही हात असल्याचे सांगितले होते. पण आता ही शिवसेना पुर्णपणे बदलली आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेससारख्या पक्षाशी युती करणार नाही. पण उद्धव ठाकरेंनी फक्त सत्तेसाठी देशद्रोही पक्ष काँग्रेसशी हात मिळवणी केली आहे, असे त्या मुलाने म्हटले आहे. तसेच आता हिंदुत्व आणि नवनिर्माण काय असतं हे राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्राला सांगणार, असे त्या मुलाने म्हटले आहे.
तसेच आता शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. त्यामुळे मुघल सेना आणि भाजप हे वेगवेगळे झाले आहे. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्यावर खुप नाराज आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणूकीत महाराष्ट्राची जनता मनसे आणि भाजपलाच निवडून देईल, असेही त्या मुलाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मी हात जोडून विनंती करत राहीले पण…”, मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या
‘धर्मवीर’ची साक्षात बाॅलीवूडचे मॅजिक मॅन राजामौलींनाही पडली भूरळ; तरडेंची भेट घेत म्हणाले…
“IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली?”, लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ