Share

‘नवाब मलिक चांगला माणूस अटक व्हायला नको होती’, केंद्रिय मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांना नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. (nawab malik is a good man he should not have been arrested say ramdas-athawale)

यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे भाजप सरकारचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, कुणाला त्रास द्यावा ही भूमिका आमची नाही, असे रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले म्हणाले.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नवाब मलिक माणूस चांगला आहे. परंतु, जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून अटक केली. त्यात भाजप सरकारचा काही संबंध नाही. कुणाला त्रास द्यावा ही भूमिका आमची नसल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी टीका करताना भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला. बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी,असे वादग्रस्त वक्तव्य केले.

तसेच ठाकरे सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
”हिमालयातून अभ्यास करून आलेल्या राज्यपालांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी योग्य माहिती द्यावी”
छत्रपतींचे खरे गुरू कोण? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ जूना व्हिडियो व्हायरल
Varsha Usgaonkar Birthday: वर्षा उसगांवकरने एकदा केलं होतं टॉपलेस फोटोशूट, झाली होती प्रचंड टीका
आमिर खानने मराठी शिकण्यासाठी ‘या’ अभिनेत्याची घेतली होती मदत, स्वत:च खुलासा करत म्हणाला..
‘मी सीटबेल्ट लावले आणि गाडी दाणकन खांबावर घातली’, उदयनराजेंचा किस्सा ऐकून प्रेक्षकही अवाक

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now