Share

दाऊदची बहीन हसीना पारकरचा बॉडीगार्ड राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; ईडीच्या दट्ट्यानंतर मलिकांची कबुली

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंबईतील गोवावाला कंपाऊड संदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. मलिक यांनी ईडी चौकशीत काही खुलासे केले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेल याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक अटकेत असून त्यांनी ईडीला सांगितले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी २००२ पासून ओळखत होतो. तो राष्ट्रवादी कार्यकर्ता होता आणि तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात काम करत होता. गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या, असं नवाब मलिक यांनी जबाबात म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, सलीम पटेल हा हसीना पारकरचा जवळचा निकटवर्तीय होता. तिच्या सर्व व्यवहारांची त्याला कल्पना असायची. सलीमला गोवावाला कंपाऊड व्यवहारात १५लाख रुपये नवाब मालिकांकडुन मिळाले होते. या व्यवहारात मालिकांचा भाऊ असल्म मलिक सहभागी असल्याचे समोर येत आहे. यामुळे मालिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात ईडीकडून नवाब मालिकांच्या पत्नीला २ वेळा तर मुलाला ५ वेळा समन्स पाठवण्यात आला होता मात्र ते चौकशीसाठी आलेच नसल्याचे चार्जशीटमध्ये म्हंटले आहे. अशा प्रकारे मालिकांची पत्नी व मुलगा मनमानी करत असल्याचे ईडीने आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वी दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याचा जबाब ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नोंदवला आहे. त्यामध्ये आपली आई हसीना पारकरने ती जमीन नवाब मालिकांना विकल्याचा दावा अलीशाहने केला होता त्यामुळे नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

ईडी चौकशीत नवाब मलिकांनी एका गुन्हागारी जगताशी संबंधित व्यक्तिला पक्ष कार्यकर्ता म्हणणं हे राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा लोकांमध्ये वाईट होण्यास कारणीभूत ठरू शकते. यामुळे पक्षावर टिका करण्यास विरोधकांना आयता मुद्दा हाती लागला आहे.

महत्वाच्या बातम्या
scam 2003 मध्ये ‘हा’ अभिनेता बनला अब्दुल करीम तेलगी, रील-रिअल लाईफमध्ये फरक करणे कठीण
‘मी शिवसेनेचा वाघ, मला दोन बोके दिसतायत त्यांची मी शिकार करणार,’ सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी
मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..
‘जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या,’ शरद पवारांचे थेट मोदी सरकारला आवाहन

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now