राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना ईडीने अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीची मुदत आज संपत असल्याने नवाब मलिक यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
यावेळी ईडीने पुन्हा नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नवाब मलिकांची कोठडी सहा दिवसांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. त्यावर नवाब मलिकांच्या वकीलांनी ईडीचा विरोध केला. तसेच सुनावणीदरम्यान आणखी एक खुलासा झाला आहे.
ईडीच्या वकीलांनी न्यायालयात माहिती दिली की, नवाब मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख नाही तर ५ लाख दिले होते. ५५ लाख रुपये दिले ती एक टायपिंग चूक होती. ईडीचे वकील पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीची आवश्यकता आहे. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यामुळे त्यांचा जबाब पुर्ण घेता आला नाही.
त्यांची पुर्ण चौकशी करता आली नाही. ASG अनिल सिंग यांनी नवाब मलिकांच्या ६ दिवस कोठडीची मागणी केली आहे. अनिल सिंग यांनी अशीही माहिती दिली की, सरदार खान हा ताब्यात आहे त्याचा जबाब घेण्यात आला आहे. सरदार खानचा जबाब कोर्टाला वाचण्याकरता दिला होता. आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे.
त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काही जणांचे जबाब नोंदवले आहेत त्यामुळे नवाब मलिक यांची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील व्यवहार पाहता याशिवाय या प्रकरणात अधिक माहिती समोर येत आहे. आधीच्या रिमांड ऍप्लिकेशनमध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन नमूद आहेत.
हसीना पारकरचे स्टेटमेंट, जेलमध्ये असलेल्या दोषींचे स्टेटमेंट, मालकीण असलेली मुनिराचं स्टेटमेंट. या संदर्भात मलिक यांची चौकशी आम्हाला करायची आहे. यावर नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई म्हणाले की, ईडीने नीट गृहपाठ करावा. आधी ५५ लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा केला, टेरर फंडिगचा आरोप केला पण आता ईडी सांगत आहे की टायपिंग मिस्टेक झाली आहे, असे अमित देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
ना घोडा, ना गाडी, ना कार, थेट स्ट्रेचरवर नवरदेव पोहोचला लग्नमंडपात, वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट
‘पावनखिंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून भारावून गेला चिन्मय मांडलेकर; म्हणाला, ‘आम्ही धन्य झालो’
रशियाच्या अणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत, नागरिकांनी ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी केली गर्दी
विधिमंडळात खाली डोकं वर पाय करणारे आमदार संजय दौंड कोण आहेत? शरद पवारांच्या एका शब्दावर झालते विजयी