महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधताना दिसून येत असतात. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्ममातून माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. (nawab malik big allegation on devendra fadanvis)
सरकारपाडण्यासाठी सहाकार्य न केल्यामुळे ईडीकडून माझे कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनाही भाजपवर जोरदार टीका केली आहे.
हे सगळं कटकारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर आणि कशी कारवाई करायची याबद्दल सूचना देत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध ईडीकडून होणाऱ्या कारवाईची सर्व सुत्रे देवेंद्र फडणवीस हाताळत असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही चौकशीच्या फेऱ्या लावल्या आहे. त्यांना वाटतंय घाबरुन महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, पण हा त्यांचा गैरजमज आहे, असेही नवाब मलिकांनी म्हटले आहे.
ईडीच्या माध्मयातून सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. पवारसाहेबांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते. त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकारला दाबण्याचा प्रयत्न कराल तितकी जनता आमची साथ देईल, असे नवाब मलिकांनी म्हटले आहे.
तसेच संजय राऊतांनी मांडलेली परिस्थिती सत्य आहे. या सगळ्या कारवायांवर कुणीही घाबरणार नाही. ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंह राजीनामा देतो आणि त्याला उत्तर प्रदेशमधून भाजपची सीट मिळते, याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले आहे.
तसेच सत्तेचा वापर करुन हे करत आहात परंतू सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर काय अवस्था होईल, हे भाजपच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्याचे उत्तर अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायद्याने काम करावे, भाजप कार्यकर्ता म्हणून नाही, असेही नवाब मलिकांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना, डेल्टा, ओमीक्रोन, BA.2 मुळे भारतात झालेत 5 लाख मृत्यू; पुढे काय वळण घेणार ही महामारी?
टाटा सुमोच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहीतीय का? वाचा ती मन हेलावून टाकणारी स्टोरी
लतादीदींचे डुंगरपूरच्या राजकुमारावर होते मनापासून प्रेम, पण ‘या’ कारणामुळे लग्नाचे स्वप्न भंगले