‘बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता. शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही, असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malib) यांनी सांगितले. मलिक यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. (nawab malib speaks on shiv sena supremo balasaheb thackeray decided not to go with bjp)
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray )यांनी युतीचा निर्णय घेतला होता, तसाच त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. दहा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे असा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही. मात्र 2019मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असं मलिक म्हणाले.
तसेच दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले. मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत आहेत. पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे, असेही मलिक यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, ‘उद्धव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला, असेही त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हते, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना? नाही तर एवढी मोठी पत्रकार परिषद कशाला घेतली असती?, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
राऊत यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते असं म्हणता तर मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला. सगळं काही लागलं. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुपरहिट, दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत झालं आहे. त्यामुळे आपण सर्व अस्वस्थ आहात, असा चिमटा राऊत यांनी काढला.
महत्त्वाच्या बातम्या
hey baby चित्रपटातील अक्षय कुमारची ‘एंजल’ झालीये आता मोठी, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
“इतक खोटं करायचं कि ते उघडं नागडं होऊन समोर येतं, याचा अर्थ किरण माने चुकलेले नाही”
मनसे स्टाईल राष्ट्रवादीत चालणार नाही; रुपाली पाटलांना थेट अजितदादांनीच दिले शिस्तीचे धडे
भयानक! वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना महिलेचा मृत्यु, कारण वाचून धक्का बसेल