सध्या राणा दाम्पत्य चांगलच चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे चांगलेच अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याने १४ दिवसांचा तुरुंगवास देखील भोगला.
तसेच त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा मुद्दा लावून धरत मुख्यमंत्र्यांना सातत्याने लक्ष केले. ‘हनुमानासाठी आपण १४ दिवस काय, १४ वर्षे तुरुंगात जाऊ,’ असही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं होतं.
त्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्लीत जाऊन हनुमान चालीसा पठण केले होते. त्यानंतर हा वाद आणखीच चिघळला. त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने ‘आम्हाला महाराष्ट्रात कशाप्रकारे हनुमान चालीसा म्हणून दिली जात नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.’
अजूनही राणा दाम्पत्याकडून शिवसेनेवर टिका करण्यात येत आहे. असे असतानाच दुसरीकडे नवनीत राणांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची ‘बोबडी वळली’ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राणांना भगवान हनुमानाचं खरं नाव काय होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर राणांना उत्तर देता आलं नाही. तसेच प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची चांगलीच पंचाईत होताना दिसली.
😂😂😂😂😂😂 https://t.co/9z62SeuOwu
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2022
हनुमानाचं नाव पहिले हनुमान नव्हतं, ते कसं पडलं, असे नवनीत राणा यांना विचारण्यात आले. हा व्हिडीओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेअर करत मिश्किल हास्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या व्हिडिओची तुफान चर्चा सुरू आहे. सोबतच सोशल मिडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
वाचा नेमकं व्हिडिओत काय घडलं आहे. नवनीत राणा यांना हनुमानाचं नाव पहिले हनुमान नव्हतं, ते कसं पडलं, असे विचारण्यात आले. त्यावर नवनीत राणा यांनी उत्तर दिले की, तुम्ही आता इतिहासात नेत असाल तर आम्ही हनुमानाविषयी माहिती घेऊ. या सगळ्याचा इतिहास पुन्हा वाचू.’
महत्वाच्या बातम्या-
शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? ते उध्वस्त करा; मनसेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
ज्ञानवापी मशीद प्रकरण; ‘या’ पुराव्यामुळे हिंदू पक्षकारांच्या दाव्याला बळकटी मिळणार
आजवर सोज्वळ भूमिका करणारी प्राजक्ता माळी बोल्ड वेब सिरीजमुळे मराठी प्रेक्षकांच्या निशाण्यावर