Share

‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’

udhav thackeray

राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दिक वाद अजूनही थांबलेला नाहीये. पुन्हा एकदा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुख्यमंत्र्यांना एक नवं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता हे आव्हान मुख्यमंत्री स्विकारणावर का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केला. या प्रकरणात राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. याचाच धागा पकडत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. ‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’, असं त्यांनी म्हंटलं आहे.

याबाबत बोलताना त्या म्हणतात, ‘मी शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो, त्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन असे सांगितले आहे. इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, ‘तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल,’ असेही नवनीत राणा यांनी म्हंटलं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी हे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणी शौचालय उभारून तुम्ही कोणाची अवलाद आहात हे दाखवून द्या’
बारामतीच्या गांधीसाठी नथूराम…’; शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाला भोवलं
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now