Share

‘चला घराच्या बाहेर निघा’ संतापलेल्या नवनीत राणा थेट पोलिसांनाच धमकावू लागल्या; पहा व्हिडिओ

राज्यातील हनुमान चालिसाचा वाद वाढत चालला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. पण दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. (navneet rana angry on police)

अशात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोघांना त्यांच्या घरातून अटक केली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. राणा दाम्पत्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिवसैनिकांनीही आनंदोत्सव साजरा केला.

हनुमान चालिसाच्या पठणाची घोषणा केल्यावरच नवनीत राणा यांच्या अडचणी वाढू लागल्या होत्या. नवनीत आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्रातील खार पोलीस ठाण्याचे पोलिसांनी नवनीत राणा यांच्या घरी जाऊन त्यांना आणि त्यांच्या पतीला अटक केली.

यादरम्यानचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी नवनीत राणांना आणि त्यांचे पती रवी राणांना अटक करण्यासाठी पोहचले आहे. मात्र त्यांनी आपण येणार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. यावेळी त्या चला घराच्या बाहेर निघा असे म्हणत पोलिसांना धमकी देताना दिसून येत आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आता दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याआधी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून शिवसैनिकांना माझ्या घरी पाठवले होते, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला होता.

तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल करत नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, आमच्या हातात काठी नाही. आम्हाला फक्त मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायची आहे. पण मुख्यमंत्र्यांना यात अडचण आहे. मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now