नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत. जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
काही दिवसांपूर्वीच निर्मला सितरामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. याच पार्श्वभूमीवर नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून ‘महाराष्ट्राच्या विकास वाटा’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाला गडकरी यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राज्यमंत्री भागवत कराड, आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
तसेच ‘आम्ही देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. देशातील 20 रस्ते असे आहेत की तिथे विमान सुद्धा उतरू शकतं,’ असं गडकरी यांनी सांगितलं. याबाबत ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. मी राज्यात 5 लाख कोटींचे रस्ते बनवले असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ‘मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमान देखील उतरू शकतात. सांगलीतही एक लॉजीस्टिक पार्क बांधणार आहोत, ज्या रस्त्यावर विमानं देखील उतरतील”. तसेच वॉटर टॅक्सी सुरू करायच्या आहेत. ज्या दक्षिण मुंबईतून 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्टला जातील, असं गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, “1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 75 टक्के लोक गावात राहत होती. मात्र आता 25 टक्के लोकं राहतात. गावात सोयीसुविधा आणि साधन नसल्याने ना नाईलाजाने लोक शहरात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाची परिस्थिती खराब आहे, तीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पुढे गडकरी म्हणाले, ‘केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार – किरीट सोमय्या
हिंदुस्तानी भाऊची जामीनावर सुटका ? हिंदुस्थानी भाऊचे वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती…
लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट
कहाणी गाणकोकीळेची: या कारणामुळे नाही केले लग्न, ५० वेळा पाहिला होता एकच चित्रपट