Beed : आपण पहातो लग्न म्हटले की मोठ्या थाटामाटात तयारी सुरु असते. पण अशीच तयारी प्रत्येक मुलाला आणि मुलीला मनाची देखिल करावी लागते. लग्नापूर्वी (marriage) नवरदेव नवरीच्या मनात एकमेकांविषयीच्या अनेक कल्पना जन्म घेतात. हे स्वप्न जगत असताना ते हरखून जातात. पण अशा वेळी एखादी घटना घडली तर संपूर्ण आनंदावर विरजण पडते.
होत्याचे नव्हते होते. बघितलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होतात. अशीच एक घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) नवरदेवाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
धीरज तट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. धीरज अंबाजोगाई शहरातील बॅंक काॅलनी परिसरात राहात होता. धीरजला दोन बहिणी आहेत. धीरज हा वंसत तट यांचा एकुलता एक मुलगा आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने तट परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज तटचा तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला असून १८ डिसेंबरला लग्नाचा शुभ मुहूर्त काढण्यात आला होता. लग्न अगदी थाडात पार पाडण्यासाठी तड कुटुंबीय जोमाने काम करत होते. परंतु, काळाने घात केला आणि धीरलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, धीरज तट हा आपेगाव येथिल मुळचा रहिवासी आहे. धीरजच्या पार्थिवावर त्याच्याच गावी अंत्यसंस्कार झाले. धीरजने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले होते. धीरजच्या जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –