‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (tarak mehta ka ulta chashma) ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेत ‘नट्टू काका’ची भूमिका साकारणारा अभिनेता घनश्याम नायक बद्दल सांगणार आहोत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘नट्टू काका’ ही व्यक्तिरेखा सर्वाधिक चर्चेत होती. गेल्या वर्षी कॅन्सरशी लढत असताना नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे जग सोडून गेले. आज आम्ही तुम्हाला एका मुलाखतीबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणांबद्दल आणि त्यांची शेवटची इच्छा काय होती? याबद्दल खुलासा केला आहे.
मृत्यूपूर्वी चेहऱ्यावर मेकअप करण्याची त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होती, असे विकासने सांगितले आहे. वडील घनश्याम नायक यांच्या या इच्छेला मान देत त्यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणी एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टला घरी बोलावून त्यांचा संपूर्ण मेकअप करून घेतला होता.
ही गोष्ट खुप कमी लोकांना माहिती होती. पण आता त्याने खुलासा केल्यानंतर अनेक लोक भावूक झाले आहे. शेवटच्या क्षणीही घनश्याम नायक यांनी अभिनयाला उच्च स्थानावर ठेवले. पुढे तो म्हणाला की, मृत्यूपूर्वी वडिलांच्या चेहऱ्यावर एक गाढ शांतता होती. मृत्यूच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांनी काय सांगितले होते तेही विकासने या मुलाखतीत सांगितले होते.
विकासच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी घनश्यामजी आपण कोण आहोत हे विसरले होते. विकासच्या मते, त्यानंतरच त्यांना समजले की त्यांचे वडील लवकरच त्याला सोडून दुसऱ्या जगात जाणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत घनश्याम यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले होते.
ते म्हणाले होते की, मला खात्री आहे की मी 100 वर्षे जगणार आहे आणि मला काहीही होणार नाही. घनश्याम नायक यांना असे वाटायचे की कोरोनाला घाबरून घरी बसण्यापेक्षा काळजी घेऊन काम केले पाहिजे. ते म्हणायचे की, मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि मरताना देखील चेहऱ्यावर मेकअप घेऊन जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
सून असावी तर अशी! सासऱ्यांच्या निधनानंतर सासूचे जडले दुसऱ्यावर प्रेम, सुनेनं लावून दिलं धुमधडाक्यात लग्न
PHOTO: अर्जुन कपूरच्या बहिणीने वजन घटवून सगळ्यांनाच केले चकीत, आता दिसते खुपच सुंदर आणि हॉट
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
शिबानी दांडेकरने प्रेग्नेन्सीच्या चर्चांवर सोडले मौन, म्हणाली, टकीला जास्त पिल्यामुळे मला..