सध्या नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे हे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. जयंत नाईकवरे हे नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. (nashik top cop deepak pande trasfered)
गेल्या काही महिन्यांपासून दीपक पांडे हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले होते. लेटरबॉम्ब आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे ते चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी दीपक पांडे यांनीच बदलीचा अर्ज केला होता. त्यानंतर आता त्यांना महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक पद सोपवण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही व्हिआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. त्यामुळे आता अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही कृष्णप्रकाश यांची बदली झाल्याची माहिती समोर आली होती. पण ती अफवा होती, पण आता त्यांची खरंच बदली झाल्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.
हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाईचे आदेश, महसूल खात्यातील लेटरबॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे विविध आदेश दीपक पांडे यांनी दिले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंवर कारवाई केली होती, त्यामुळेही ते चर्चेत आले होते.
महसूल विभागाचे अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटसारखे आहे. यातून एक जीवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो आहे. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सर्वसामान्य नागरिकांचा छळ करुन वित्तीय आणि जिवीतास धोका निर्माण करत आहे, असा आरोप दीपक पांडे यांनी केला होता.
तसेच दीपक पांडे यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत अशी मागणी केली होती. ही मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी गृह विभागाने दीपक पांडे यांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
किरीट सोमय्यांना न्यायालयाने झाप झाप झापले; खोटे आरोप न करण्याची दिली ताकीद
“सिल्वर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ जणींना भेटून त्यांच्या वेदना जाणायच्या आहेत” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांवर तिच्या आई वडिलांनीच केले गंभीर आरोप; वाचा काय आहे प्रकरण