Share

नाशिकच्या सुफी बाबाच्या हत्येचे खरे कारण आले समोर; धार्मिक नाही, तर ‘या’ कारणामुळे केली होती हत्या

नाशिकच्या येवला परीसरात मुस्लिम धर्मगुरु जरिफ बाबा यांच्या हत्येने फक्त राज्यातच नाही, तर देशात खळबळ उडाली होती. धार्मिक वादातून जरिफ बाबा यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. (nashik sufi baba death reason)

आता या हत्येमागचे खरे कारण समोर आले आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. प्रॉपर्टीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे गुन्हेगारांनी सांगितले आहे.

मुस्लिम अफगाणी धर्मगुरु जरिफ बाबांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. ती हडप करण्यासाठी हा खुन करण्यात आल्याचे चौघांनी म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गफार खान, गणेश झिंजाट, रवींद्र तोरे आणि पवन आहेर यांना ताब्यात घेतलेले आहे.

तसेच या हत्येत आणखी दोन लोकांचा समावेश असल्याचेही गुन्हेगारांनी कबूल केले आहे. त्यामुळे पोलिस आणखी दोन आरोपींचा शोध घेत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पोलिस या आरोपींचा शोध घेत होत. पण अखेर ते आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान, धर्मगुरुंच्या हत्येमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच हा वाद वाढताना दिसून येत होता. ते धर्मगुरु मूळ अफगाणिस्तानमधील होते आणि येवल्यामध्ये त्यांना सुफी बाबा म्हणून ओळखले जायचे. ते ३५ वर्षांचे होते. येवल्यातील एमआयडीसी परीसरात त्यांची हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव खरे नाव ख्वाजा सय्यद चिश्ती असे होते. ज्यांना येवल्यामध्ये सुफी बाबा म्हणून ओळखले जायचे. त्यांची कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याने त्याच्यावर अनेकांचा डोळा होता. त्यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांची हत्या केली आहे.

मगत्वाच्या बातम्या-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट; मोठी राजकीय घडामोड घडणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याने सांगितला ‘तो’ भावूक करणारा किस्सा
संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नामांतराला दिली स्थगिती

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now