Share

महाराष्ट्र हळहळला! नाशिकच्या जवानाला देशसेवा बजावताना नेपाळ सीमेवर वीरमरण; कारण वाचून संताप येईल

नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आल्याची दुःखद घटना समोर आली आहे. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला.

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये नाशिकच्या अमोल हिंमतराव पाटील जवानाला वीरमरण आले आहे. अमोल यांच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.

अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल हिंमतराव पाटील हे नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते.

दरम्यान, उच्चदाब प्रवाहाच्या तारांकडे दुर्लक्ष प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा आणि खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिली होती. मात्र वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेले अमोल पाटील सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. तसेच अलीकडेच मुलगी झाल्याचा आनंदही त्यांनी गावात साजरा केला होता. जाताना आई, पत्नी आणि आपल्या चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. मात्र आता अमोल यांच्या निधनाने संपूर्ण नाशिक जिल्हयावर तसेच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
..त्यावेळी ढसाढसा रडत असताना अनवाणी पायांनी रस्त्यावरून पळत सुटली होती रेखा, वाचा किस्सा
कादर खान यांनी दिलेल्या या अटी पुर्ण करताना ढसाढसा रडले होते दिलीप कुमार, वाचा भन्नाट किस्सा
पुण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकून पोलीस देखील हादरले…
वयाच्या 59 व्या वर्षीही ‘ही’ अभिनेत्री दिसते २९ वर्षांची; 6 मुलांचे वडील असलेले धर्मेंद्र यांच्यासोबत होते अफेअर

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now