Homeताज्या बातम्या..त्यावेळी ढसाढसा रडत असताना अनवाणी पायांनी रस्त्यावरून पळत सुटली होती रेखा, वाचा...

..त्यावेळी ढसाढसा रडत असताना अनवाणी पायांनी रस्त्यावरून पळत सुटली होती रेखा, वाचा किस्सा

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली आहे. एक वेळ अशी आली की रेखाचे नाव अभिनेता राज बब्बरसोबतही जोडले गेले. 80-90 च्या दशकातील यशस्वी अभिनेते राज बब्बर आणि रेखा यांची जवळीक एकेकाळी चर्चेत होती. राज बब्बर यांना पत्नी स्मिता पाटील यांच्या निधनाने धक्का बसला होता. त्याच वेळी, रेखाच्या मनात अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे नाते तुटण्याचा तणाव इतका होता की, ती त्यांना विसरू शकली नाही.

रेखा आणि राज बब्बर यांनी 80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये ‘अगर तुम ना होते’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश होता. दुःखात बुडालेल्या राज बब्बर आणि रेखा यांना एकमेकांचा आधार मिळाला तेव्हा ते दोघेही एकमेकांचे दु:ख आणि वेदना शेअर करत भावनिक जवळ आले. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यातील जवळीक वाढली.

rekha_and_raj_babbar.jpg

राज बब्बर यांचे पत्नी आणि अभिनेत्री स्मिता पाटील हिच्यावर खूप प्रेम होते हे सर्वांना माहीत आहे. राज बब्बरने पहिली पत्नी नादिरा हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर स्मिता पाटीलशी लग्न केले. मात्र, राज आणि स्मिताचा संसार फार काळ टिकला नाही. मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. हा तो काळ होता जेव्हा राज आणि रेखा हे अनेक चित्रपटात एकत्र काम करत होते. दोघेही त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे एकटे होते. आयुष्याच्या या शून्यतेने दोघांना जवळ आणले.

80 च्या दशकात या जोडीची खूप चर्चा झाली होती. आता राजच्या रेखासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना रेखाने त्याच्याशी लग्नासाठी संपर्क साधला. राजने या लग्नाला नकार देताच, या मुद्द्यावरून त्याचे रेखासोबत भांडण झाले. रिपोर्ट्सनुसार, रेखाला त्यावेळी राज बब्बर यांनी सांगितले होते की, त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीकडे जायचे आहे. हे ऐकून रेखा राज बब्बरवर चांगलीच चिडली.

मुंबईतील एका रस्त्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके वाढले की रेखा राज बब्बरवर खूप चिडली. यानंतर रेखा खूप निराश झाली, त्यावेळी तिने चप्पलही घातली नव्हती आणि डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते तसेच त्या ठिकाणाहून अनवाणी पळत निघाल्या. मुंबईच्या रस्त्यावर वेड्यासारखे धावताना त्यांना अनेकांनी पाहिले होते.

अनेक मुलाखतींमध्ये जेव्हा रेखाला या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने अशा कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला होता. तिनेही राजसोबतच्या नात्याची उघडपणे कबुली दिली नाही, पण राज बब्बरने रेखापासून कधीही आपल्या अफेअरबद्दल काहीही लपवले नाही. त्याने कबूल केले की तो आणि रेखा कधीकाळी खूप जवळ होते.

महत्वाच्या बातम्या-
गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट कोणी आणि कुठे रचला होता? वाचा इनसाईड स्टोरी
VIDEO: मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोराला पोलिसाने फिल्मी स्टाईलने पकडलं, लोकांना वाटलं शुटींग चालू आहे
मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे
सैन्यातील जवानाच्या पत्नीवर दिराचा बलात्कार; जवान म्हणतो घरात रहायचे तर सहन कर