सध्या मंगळ ग्रहावरील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत मंगळावर असलेल्या एका पठारावर एक दरवाजा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळावर कोणाचे घर आहे? असा प्रश्न लोकांना पडला आहे. (nasa share mars viral photo)
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर एक दरवाजा शोधला आहे. नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावर दरवाजासारखा आकार दिसला आहे. रोव्हरच्या नवीन फोटोमध्ये ही रंजक गोष्ट समोर आली आहे, ज्यानंतर लोक याला एलियन्सच्या घराचा दरवाजा सांगत आहेत. सोशल मीडियावर तर त्याला एलियन्सच्या अस्तित्वाशीही जोडले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा दरवाजा मंगळाच्या पृष्ठभागावर खडकांपासून बनलेला आहे, जो दुसऱ्या जगाकडे जाण्याचा मार्ग वाटतो. पण वैज्ञानिकांनी यापैकी कोणत्याही दाव्याची पुष्टी झालेली नाही. रोव्हरचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक अंदाज लावत आहेत.
अनेकांनी याला फक्त तुटलेला खडक असे म्हटले. त्यामागेचे कारणही हैराण करणारे आहे. ते म्हणजे गेल्या काही काळापासून मंगळ ग्रहावर अनेक भूकंप होत आहेत. ४ मे रोजी मंगळावर भुकंप झाला होता. तो या महिन्यातील सर्वात मोठ्या भूकंप असल्याची नोंद करण्यात आली आहे.
हा दरवाजासारखा आकार काय आहे आणि तो कसा अस्तित्वात आला हे समजून घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. नासाने सांगितले की, ग्रीनह्यू पेडिमेंट नावाचे हे भूवैज्ञानिक वैशिष्ट्य रोव्हरच्या कॅमेऱ्याने टिपले आहे. दरवाजासारखा हा खडक खूप मोठा दिसतो. परंतु प्रत्यक्षात ते फक्त काही इंच किंवा काही सेमी लांब असू शकते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.
दरम्यान, याआधी चीनच्या जुरोंग रोव्हरने मंगळावर मोठे यश मिळवले होते. रोव्हरला असे पुरावे सापडले की मंगळावर अंदाजापेक्षा जास्त काळ पाणी होते. रोव्हरने युटोपिया प्लॅनिटिया नावाच्या भागात खनिजे, वातावरण आणि मैदानी प्रदेशात पसरलेल्या पाण्याच्या आणि बर्फाच्या विस्तृत क्षेत्राचे परीक्षण केले.
रोव्हरच्या डेटावरून असे सूचित होते की ज्या वेळी अनेक शास्त्रज्ञांना मंगळ कोरडा आणि थंड आहे असे वाटले तेव्हा युटोपिया प्लानिटियावर पाणी होते. या दाव्यानेही अनेक वैज्ञानिकांना प्रश्नात पाडले होते. अशात या दरवाजाचा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर वैज्ञानिक शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ब्राम्हण महासंघाने घेतलेली भूमिका योग्य नाही, पवारांना भेट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया
‘आपला सोनू आता मोठा माणूस होणार’, सोनूसाठी सोनू सुदने दिला मदतीचा हात, केली ‘ही’ मदत
ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी सर्वेसाठी पोहोचली टीम, शिवलिंगबाबत झाला ‘हा’ मोठा खुलासा