राजकीय दृष्ट्या आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी होणार असल्याची दाट शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने तत्कालीन ठाकरे सरकारला बंडखोर आमदारांवर 11 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याची मागणी केली होती.
कोर्टाने या प्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनादेखील नोटीस बजावली आहे. या प्रकरणी नरहरी झिरवळ यांनी सुप्रीम कोर्टाला आपला जबाब पाठवला आहे. याबाबत झिरवळ यांनी सुप्रीम कोर्टाला स्पष्टीकरण दिलं. आज बंडखोर आमदारांच्या भवितव्याबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
वाचा काय म्हंटलं आहे नरहरी झिरवळ यांनी..?
झिरवळ यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची नोटीस कायद्याप्रमाणेच दिली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी दिलेली 48 तासांची मुदतही नियमबाह्य नाही. माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी ते 24 तासांत न्यायालयात पोहोचल्याचे आश्चर्य वाटले.
‘विधानसभेच्या नियमांनुसार विधानसभेच्या उपाध्यक्षांना विधानसभेचं अधिवेशन सुरु असतानाच हटवता येऊ शकेल. त्यामुळे बंडखोरांनी माझ्याविरोधात पाठवलेली अविश्वासाची नोटीस ही संविधानाच्या कलम 179 (सी) नुसार वैध नाही”, असं झिरवळ यांनी स्पष्टच सांगितलं.
याचबरोबर याचबरोबर बंडखोर आमदारांना दिलेली मुदत प्रथमदर्शनी होती. त्यानंतर आमदारांनी कुठल्याहीप्रकारे संपर्क साधला नाही. नोटिशीला उत्तर देण्याऐवजी ते सर्वोच्च न्यायालयात गेले, असं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
‘मला 39 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची नोटीस अनोळखी ईमेल आयडीवरुन आली होती. त्याचबरोबर ती नोटीस अशा व्यक्तीच्या मेल आयडीवरुन पाठवण्यात आली जे विधानसभेचे देखील सदस्य नाही. त्यामुळे मी त्या नोटीशीला स्वीकारलं नाही. तसेच या नोटीसला रेकॉर्डवर घेण्यास मी नकार दिला”, असं झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यात्मिक गुरू म्हणाले, मानव ही लुप्त होणारी किंवा..
एकनाथ शिंदेंची गोची! ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; थेट अमित शहा यांना लिहिणार पत्र
मानलं गड्या! ९ कोटींची नोकरी सोडून ‘या’ पोरीने घेतला संन्यास, कारण वाचून कौतुक कराल
काय चाललंय काय? राष्ट्रपती भवनाच्या स्विमिंग पुलमध्ये आंदोलकांची मस्ती, भवनाच्या बेडरूममध्ये..