शिवसेनेच्या अडचणी काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे आता आणखीच शिवसेना गोत्यात आल्याच पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राजीनामा दिला आहे.
‘भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा..जात, गोत्र अन् धर्म अमुचा… शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!”, असं म्हस्के ट्विट करून म्हंटलं आहे.
https://twitter.com/nareshmhaske/status/1540748818043482112?s=20&t=ecXHt7H0ZZb6DI4ap6MKEQ
दरम्यान, म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. यामुळे म्हस्के यांनी राजीनामा दिल्याने आता शिवसेना मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सध्या हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीमधून पळून देखील आले आहेत.