Share

१०० व्या वाढदिवसानिमित्त मोदींची आईला खास भेट, ‘या’ रस्त्याला देणार आईचे नाव

modi

आजचा दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने मोदींनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

वाढदिवसाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी हे आई हिराबेन यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये पोहचले. गुजरातमधील गांधीनगर येथे भावाच्या घरी जात मोदींनी हिराबेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही, तर आईला १००व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोदींनी जे केले ते पाहून तुमचेही डोळे अश्रूंनी भरून जातील.

वाढदिवसाचे निमित्त साधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. इतकंच नाही तर, मोदींनी यावेळी आईला एक शालही गिफ्ट दिली. हे फोटो मोदींनी सोशल मिडियावर शेअर केले आहे.

 

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते हिराबाई आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत आहेत. याचबरोबर ते आईशी हसून चर्चा करत असल्याच पाहायला मिळत आहेत. सध्या हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.

दरम्यान, “आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी सुद्धा त्यांनी आईची भेट घेतली होती. ते फोटोही व्हायरल झाले होते.

तर दुसरीकडे, गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे. गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी बुधवारी अधिकृत निवेदनामध्ये सांगितले की,हिराबेन यांचे नाव सदैव जिवंत राहावे, या उद्देशाने ८० मीटर रस्त्याचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

महत्त्वाच्या बातम्या
35 % वाल्या लेकास बापाने दिला ‘असा’ धीर; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
मोदींना पुन्हा माफिवीर बनावं लागेल अन् अग्निपथ मागे घ्यावं लागेल, राहुल गांधीनी स्पष्टच सांगितलं
पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता
जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे ‘इंडीया ॲप’; जाणून घ्या त्याबद्दल..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now