देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्यांच्या सभा असो किंवा त्यांच्या दौरे असो पंतप्रधान मोदी नेहमीच चर्चेत असतात. विशेष बाब म्हणजे त्यांचे पोशाख. मोदींचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं असतात.
सध्या पंतप्रधान मोदींचे असेच काही फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान इथे इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचं आणि 5 अंडरपासचं उद्घाटन केलं. मात्र या उद्घाटनानंतर जे काही घडलं त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पंतप्रधानांनी बोगद्याचे उद्घाटन केले. त्यानंतर बोगद्यात केलेल्या कलाकृतीची पाहणी करत असताना पंतप्रधानांना काही कचरा पडल्याचं दिसलं. पंतप्रधानांनी कोणताही विचार न करता तो पडलेला कचरा उचलला. कचरा उचलतानाचा मोदींचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1538410268081803264?s=20&t=aumMAl1OEn_VKhk7ZI2lqg
सर्वत्र सध्या याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे पंतप्रधान मोदींची स्वच्छतेबाबतची जागरूकता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदी यांना बोगद्यात बाजूलाच एक पाण्याची बाटली पडलेली दिसली.
त्यानंतर त्वरित पंतप्रधानांनी ही बाटली उचलुन कचऱा पेटीत टाकल्याच पाहायला मिळत आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या 8 वर्षांत आम्ही दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवा 193 किलोमीटरवरून 400 किलोमीटरपर्यंत विस्तारली असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
KGF बद्दल करण जोहरचं मोठं वक्तव्य, म्हणाला, आम्ही असा चित्रपट बनवला असता पण…
मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे
महाबळेश्वर फिरण्यासाठी येणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने आवश्यक; महापालिकेने घेतला मोठा निर्णय