Share

काश्मिरी पंडितांवर बनलेला चित्रपटाच्या टीमने घेतली मोदींची भेट; चित्रपटाचे कौतूक करत मोदी म्हणाले…

सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने, त्याचे प्रमोशन कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झाले नव्हते, तरीही तो खूप चर्चेत आहे. (narendra modi on the kashmir files)

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप भावूक झाले. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमार याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पाहिल्यानंतर लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हे दिसून येते.

तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानले. देशभरातील लोक या चित्रपटाचे कौतुक करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अलीकडेच ‘द काश्मिर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

काश्मिर हत्याकांडाच्या वेळी पडद्यावर काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे चित्रण करण्याचे धैर्य मला पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मिळाल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. या तेलुगू निर्मात्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून थेट देशाच्या पंतप्रधानांकडून शाबासकी मिळाली आहे.

झी स्टुडिओजच्या सहकार्याने अभिषेक अग्रवाल यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी ३.५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि २ दिवसात याने त्याच्या खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. काश्मिरच्या बंडखोरीदरम्यान काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतरावर चित्रपट बनवण्याचे धाडस केल्याबद्दल पंतप्रधानांनी चित्रपट निर्मात्यांचे केले आहे.

काश्मिर फाइलच्या संपूर्ण टीमने पंतप्रधानांची भेट घेतली आणि यावेळी विवेक आणि अभिषेक यांच्यासोबत अभिनेत्री पल्लवी जोशही होती. निर्मात्याने कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधानांचा सत्कार केला. त्यानंतर मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांची ही कामगिरी ही खुप उल्लेखनीय असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला ‘द काश्मिर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. दुसरीकडे, सर्व बाजूंनी मिळालेल्या प्रतिसादामुळे निर्माता अभिषेक अग्रवाल म्हणतात की, भविष्यात त्यांच्या बॅनरखाली काही विचारप्रवर्तक आणि थीमॅटिक चित्रपट बनवण्याची त्यांची इच्छा आहे.

महत्वाच्या बातम्या-
…तर राज्यातील माजी मंत्र्यांची सुरक्षा काढा, रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी
रशियाला तोंड देता देता नाकीनऊ आले असतानाच युक्रेनवर आणखी एक देश करणार हल्ला; अख्ख जग टेंशनमध्ये
मुलगा मुख्यमंत्र्यांना पाडून झाला आमदार, तरीही सफाई कामगार आई पोहोचली कामावर; म्हणाली..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now