Share

तुळशीहार गळा कासे पितांबर..! पंतप्रधान मोदी बनले वारकरी; हातात विना अन् डोक्यावर फेटा, फोटो तुफान व्हायरल

modi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्यांच्या सभा असो किंवा त्यांच्या दौरे असो पंतप्रधान मोदी नेहमीच चर्चेत असतात. विशेष बाब म्हणजे त्यांचे पोशाख. मोदींचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं असतात.

सध्या पंतप्रधान मोदींचे असेच काही फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तू तुकोबारायांची पगडी परिधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वारकरी झाले. काही दिवसांपूर्वीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले.

त्याच निमित्ताने वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच वारकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे वारकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांचा सत्कार केला.

या वेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी, वारकरी संप्रदायाची वीणा, चिपळ्या, उपरणे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन आणि गळ्यात तुळशी हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच मोदींना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देखील देण्यात आले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1508796634204975114?s=20&t=vXs9RciU1KdUAtdfGcIY3Q

दरम्यान, आचार्य तुषार भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.’

मिळालेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते. सध्या पंतप्रधान मोदींचे हे फोटो प्रचंड व्हायरल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी तरुणाने १-१ रुपया जमवला; तीन वर्षांच्या बचतीनंतर शोरुममध्ये गेला अन्…
राज्याला आज सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला; वरुण सरदेसाई यांनी केले तोंड भरून कौतुक
महागाईचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ, ‘या’ शहरात पेट्रोलने पार केले शतक
विवेक अग्निहोत्रींचे आणि वरूण धवनचे आहे खास कनेक्शन, काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकानेच केला खुलासा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now