Share

“मला शक्य तितक्या लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचंय, मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करेन”

narendra-modi.j

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत NIA च्या मुंबई ब्रांचला धमकीचा मेल आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अशा प्रकाराचे इमेल येत असतात आणि ते पाठवणाऱ्याचा त्यात लिहिलेल्या गोष्टी करण्याचा हेतू नसतो असं एनआयएच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

मात्र यामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. ‘मला शक्य तितक्या लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारायचं आह. मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करेन. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, असे मेलमध्ये म्हंटले आहे. हा मेल कोणी पाठवला याचा सध्या तपास सुरू आहे.

यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही पाठवला आहे. तसेच हा इमेल एनआयए मुंबईला महिन्याभरापूर्वीच आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर शुक्रवारी (काल) पंतप्रधान मोदी यांना धमकीचा इमेल आल्याचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर एनआयएनं त्याला दुजोरा दिला आहे.

वाचा मेलमध्ये काय लिहिले आहे. मेलमध्ये म्हंटले आहे की, “माझ्याकडे २० पेक्षा जास्त आरडीएक्स आहे. मी २० मोठे हल्ले करण्याची योजना आखली असून सर्व आरडीएक्स मोठ्या शहरांमध्ये प्लांट करण्यात आलं आहे, असे मेलमध्ये म्हंटले आहे. पुढे मेलमधून थेट मोदींना लक्ष करण्यात आलं आहे.

‘मला शक्य तितक्या लवकर पंतप्रधान मोदींना ठार मारायचं आह. मी त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करेन. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी कुणालाही सोडणार नाही. मी २ कोटीहून जास्त लोकांना मारणार आहे”, असं या मेलमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या मेलने आता चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्ली पोलिस आयुक्तांना याबाबतचा मेल आला होता. प्राथमिक अंदाजानुसार हा मेल पूर्वेकडील राज्यातून आल्याचे सांगण्यात आले होते. याचबरोबर याआधीही काही महिन्यांपूर्वी माओवाद्यांकडून मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्री साहेब..! इथे थोडा भेदभाव होतो म्हणून…’, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
‘मी त्यांना भीक मागायला सोडू शकत नाही’ म्हणत अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित कुटुंब घेतले दत्तक
विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, आगामी चित्रपटात गुणवंत विद्यार्थ्यांना देणार संधी
..तर मी कॅमेऱ्यासमोर टॉपलेस होणार, पुनम पांडेची चाहत्यांना अजब ऑफर, उडाली खळबळ

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now