Share

पंतप्रधान मोदींनी पुन्हा केले ‘द काश्मीर फाइल्स’चे कौतूक; म्हणाले, असे चित्रपट आणखी बनले पाहिजे

सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने, त्याचे प्रमोशन कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झाले नव्हते, तरीही तो खूप चर्चेत आहे. या चित्रपटावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतूक केले होते. (narendra modi appriciate the kashmir files)

आता या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा कौतुक केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय पक्षाच्या बैठकीत काश्मीर फाइल्सचे कौतुक करताना, मोदी म्हणाले की, हा खूप चांगला चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघायला हवा.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी असे आणखी चित्रपट बनवायला हवेत असेही सांगितले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक गट अजूनही सत्य दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांनी यापूर्वीही असेच केले होते.

तसेच भाजप नेते मनोज तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी असेही म्हटले की, आपल्याला सत्य देशासमोर आणण्याची गरज आहे. याआधीही पीएम मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. द काश्मीर फाइल्सच्या टीमने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि त्यानंतर चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी या भेटीचे फोटो शेअर केले होते.

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. काश्मिरी पंडितांवर बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांत ४२.२० कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी सर्वांना हा चित्रपट पाहण्याचा संदेश दिला आहे.

याआधी मध्य प्रदेश सरकारनेही या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली होती. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्याबाबत घोषणा करताना मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देण्याचे आदेश दिले होते. अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सनी द काश्मीर फाइल्स चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या-
गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून देश भटकला होता, मोदींनी परत मार्गावर आणला- अमित शहा
माझ्याकडे ७०० लोकांची दुखभरी कहाणी, कश्मीर फाईल्सवर वेब सिरीजही बनवणार – दिग्दर्शकाची घोषणा
‘2024 मध्ये मोदी युगाचा होणार अंत, बनणार युपीए सरकार’, ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now