Share

नारायण राणेंनी लावला नव्या देशाचा आणि राजधानीचा शोध; रोमानियाचं केलं ओमानिया अन् बुखारेस्टचं केलं बुखारिया

narayan rane

रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून रशियन सैनिक वेगवेगळे शहर ताब्यात घेताना दिसून येत आहे. या युद्धामध्ये अनेक नागरिकांचा जीवही जात आहे. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी शिकत असून त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने विमान पाठवण्यास सुरुवात केली आहे. (narayan rane on romania)

ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमधील भारतीयांना घेऊन सातवे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत दाखल झाले. या विमानातून युक्रेनमध्ये अडकलेले १८२ भारतीय विद्यार्थी पुन्हा भारतात परतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहचले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. पण यावेळी बोलताना त्यांच्या तोंडून देशाचा आणि त्याच्या राजधानीचा चुकीचा उच्चार झाला आहे. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

मी विमानात जावून सर्वांना भेटलो. हे विद्यार्थी अतिशय भयभीत अवस्थेमध्ये होते. मी त्यांना सांगितले की तुम्ही भारतामध्ये सुखरुप पोहचलेले आहात. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन गंगा व्यवस्थित चालू आहे. मात्र अजूनही भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारमधील ४ मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली आहे. पण त्यानंतर त्यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले.

विद्यार्थांना भारतात आणताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, सर्वजण युक्रेनमध्ये होते. तिथली परिस्थिती पाहून ते खुप घाबरले होते. त्यामुळे ते शेजारील देश ओमानिया आणि त्याची राजधानी बुखारिया या ठिकाणी गेले होते. तिथून त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे.

नारायण राणे यांनी यावेळी देशाचा आणि राजधानीचा चुकीच्या उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार, ओमानिया नाही तर रोमानिया असे त्या देशाचे नाव आहे. तसेच त्या देशाच्या राजधानीचे नाव बुखारिया नाही, तर बुखारेस्ट असे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नारायण राणे यांना ट्रोल करण्यात आहे. काही लोकांनी तर नारायण राणे यांनी नवीन देशाचा शोध लावला आहे, असेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारतीय लोक पान खाऊन थुंकले तर २११ स्विमिंग पूल भरतील, ‘या’ शहरातील लोक थुंकण्यात आहेत आघाडीवर
भारताची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली अमेरिकन आर्मीमध्ये भरती, लोक करताय कौतूकांचा वर्षाव
आता चोर घरात शिरला की वाजणार अलार्म, airtel ने फक्त ९९ रुपयांत आणले भन्नाट डिव्हाईस

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now