Share

“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. तसेच त्यांची नाराजी गेल्या काही दिवसांत स्पष्टपणे दिसून सुद्धा आली होती. त्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी सुद्धा भाषण देण्यास नकार दिला होता, त्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. (Narayan rane on eknath shinde)

अशात एकनाथ शिंदेबाबात मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सोमवारपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत १३ आमदार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का असू शकतो. एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक ट्विट केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करुन एकनाथ शिंदे यांना शाबासकी दिली आहे.

शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांचे हे ट्विट सध्या खुप व्हायरल होत आहे. तसेच पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले की, ते कुठे आहेत असलं काही सांगावं लागत नाही, त्यांच्या नॉट रिटेबल असण्याला काय अर्थ आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोठे पाऊल उचलले. त्यांनी लगेचच वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे मुंबई आणि तिथल्या जवळच्या सर्व आमदारांनी रात्रीच बंगल्यावर हजेरी लावली.

मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. शिवसेनेतील ही मोठी बाब कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर पोहोचल्या. रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे आणि बाकी आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी माहितीही समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री आमदारांसोबत बोलत असतानाच एकनाथ शिंदेनी गेम केला, महत्वाची माहिती समोर
एकनाथ शिंदेंना फोन केला तर ऐकू येतेय गुजराती भाषेतील टोन, १३ आमदारांसह शिंदे गुजरातमध्ये?
एकनाथ शिंदेंसोबत संपर्क झालाय..; हाय होल्टेज ड्राम्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रीया

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now