Share

मुंबई महाराष्ट्रात रहायचंय फिरायचंय ना? मुंबईतील राड्यानंतर राणेंची थेट ठाकरेंना धमकी

narayan rane and uddhav thkare

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाल्याच पाहण्यास मिळाला होता. याच प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील चांगलच तापलं आहे. याच प्रकरणात आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतली आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला. दोन्ही गट आमने – सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. ठाकरे गटातील शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या.

यालाच प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणानंतर वातावरण आणखीच चिघळलं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला. अन् दोन्ही गटातील वाद पोलिसांनी मिटवला. मात्र याच प्रकरणाचा पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहे.

आज नारायण राणे मुंबईतील दादर परिसरात असलेल्या आमदार सदा सरवणकर यांच्या घरी आले होते. यावेळी राणे यांनी सरवणकर यांची विचारपुस केली. त्यानंतर माध्यम पत्रकरांशी बोलताना राणे यांनी त्यांच्या खास शैलीत शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.  महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? असा इशाराच राणे यांनी शिवसेनेला दिला.

दरम्यान, पुढे बोलताना राणे यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, ‘शनिवारी सरवणकर यांनी गोळीबार केला यामध्ये कितपत तथ्य आहे? सरवणकर यांनी तक्रार दिली आहे. पोलिस याबाबत चौकशी करतील. फायरिंग झाली असेल तर आवाज येतो. आणि मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही.’

शिवसेनेला लक्ष करताना राणे यांनी म्हंटलं आहे की, ‘मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो.’

महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now