Share

सेनेतून बाहेर पडल्यानंतर मला संपवण्यासाठी गँगश्टर्सना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या; नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

narayan rane ani thackeray

भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या एका खळबळजनक गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मला मारण्यासाठी देशाबाहेरच्या गॅंगस्टरला सुपरी दिली होती, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

नुकतीच राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखती दिली आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी शब्दात टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. याचाच धागा पकडत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. राणे याबाबत माध्यमांशी बोलत होते.

वाचा काय म्हणाले नारायण राणे?
‘शिवसेना (Shivsena) सोडल्यावर मला मारण्यासाठी देशाबाहेरच्या गॅंगस्टरला सुपरी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

पुढे बोलताना राणे म्हणाले, ‘मला मारण्यासाठी देशाबाहेरच्या गॅंगस्टरला सुपरी देण्यात आली होती,  मात्र या सर्व परिस्थीतीत मी वाचलो तो केवळ माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो. ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्या व्यक्तीदेखील माझ्याशी बोलायच्या असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.

दरम्यान, ‘सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेले नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला. आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ठाकरेंना मराठी माणसाची आठवण झाली, अशी टीका राणेंनी केली.

महत्वाच्या बातम्या-
नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी देण्याची केली घोषणा, भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
‘या’ देशावर आलीये वाईट वेळ; उष्ट्या, शिळ्या, बुरशी लागलेल्या भाकरी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
सुनील गावसकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आधी मला सचिन तेंडूलकर आणि आता उमरान मलिक..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now