Share

मंदीरावरील भोंग्यावर कारवाई करणार पवार पहीले हिंदू…; आता राणेंचीही भोंगा प्रकरणात उडी

narayan rane

राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठे वक्तव्य केले होते. आपल्याकडे शिर्डीच्या साईबाबा मदिंरात ५ वाजता काकड आरती सुरु होते. यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. (narayan rane criticize ajit pawar)

हिंदुंच्या मदिरांवरील भोंगे उतरवणारे अजित पवार हे पहिले हिंदु असतील. हे आमचं दुर्देव आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. अजित पवारांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या भोंग्याबाबत जे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार जे म्हणाले आहेत, की शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांच्यावर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

https://twitter.com/MeNarayanRane/status/1521415988054720512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521415988054720512%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fits-our-unfortune-to-be-first-hindu-to-take-such-action-narayan-rane-criticism-of-ajit-pawar-aau85

दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबाबत माहिती देताय की, त्यांनी भोंगे बंद केले. पण त्यांनी फक्त मशिदींवरील भोंगे बंद केले नाही. तर मंदिरावरील भोंगेही बंद केले आहे. आपल्याकडे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात काकड आरती होते ती पहाटे ५ वाजता होते, त्यावर कोणी का बोलत नाही.

तसेच आपल्याकडे जागरण गोंधळ कधी असतो, रात्रीच ना? गावागावांमध्ये सप्ताह कधी असतो. रात्रीच. जर यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत नसेल तर पोलिस यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतोच ना? मग आता कशासाठी वातावरण खराब करताय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना अटक करा अन्यथा संघर्ष अटळ; ‘या’ संघटनेनेही थोपटले दंड
पोलिसांकडून मनसे नेत्याचे अटकसत्र सुरु, मुंबईतून ‘या’ बड्या नेत्याला अटक
सामान्य लोकांच्या दुःखाचा पाढा वाचत मोदींवर टिका करणारे राहुल गांधींचा बारमध्ये पार्टी करतानाचा VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now