Share

या सरकारला कारवाई करण्यासाठी माझंच घर दिसतं, हे बेकायदेशीर भोंगे यांना दिसत नाही; राणे संतापले

narayan rane

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. शिवसेनेने युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत हे सरकार स्थापन केले होते. त्यामुळे भाजप नेते यावरून शिवसेनेवर टीका करताना दिसून येत असतात. (narayan rane angry on thackeray government)

आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच पुढच्या निवडणूकीत आमचे १६० आमदार असतील, असा विश्वास त्यांना दाखवला आहे. तसेच हिंदूत्वावरुनही नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने खुर्चीसाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्वाशी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला आहे. बाळासाहेबांनी कधीही हिंदूत्वाशी तडजोड केलेली नाही. मात्र मागील दोन वर्षात शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाबाबत काय भूमिका घेतल्या हे सर्व महाराष्ट्राने बघितल्या आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला कारवाई करण्यासाठी माझेच घर दिसते का? त्यांना बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का? यांनी कोल्हापूर पॅटर्न जगात राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणूकीत आमचे १६० आमदार असणार आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तसेच माझ्या घरावर करण्यात आलेली कारवाई कायदेशीर नसून फक्त राजकारणासाठी करण्यात आलेली कारवाई आहे. मुख्यमंत्रीही सुडाच्या भावनेने कारवाई करत आहे. मात्र अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवाया केल्याने आम्ही शांत बसू असं त्यांना वाटत आहे, पण तो त्यांचा गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की काढेल, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राज्य दिवाळखोरीत चाललं आहे. मुख्यमंत्र्याची त्याच्यावर नजर नसून अडीच वर्षांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी दोन तासात उरकला आहे. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. पुढच्या निवडणूकीत आमचे १६० आमदार निवडूण येतील, हे डबक्यात राहून समुद्राचे माप मोजत आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात बंधुभाव! रोजा सोडणाऱ्या मुस्लिमांसाठी हरिनाम सप्ताहात पंगत, बीडकरांचं होतंय कौतुक
भाजपला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी आखली नवी योजना, राष्ट्रपती पद हातातून जाणार?
बाळासाहेबांवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा, राज्याची बदनामी करू नका- सुप्रिया सुळे

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now