राज्यात अनेक ठिकाणी सेक्स रॅकेट सुरु आहे. या रॅकेटचा पोलिस पर्दाफाश दिसून येत आहे. आता पोलिसांनी नागपूर येथे सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली आहे, ती खुपच धक्कादायक आहे. (napur police arrest sex racket leader)
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे जी महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती ती चक्क एक पेन्शनर महिला आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर असे त्या महिलेचे नाव असून ती महिला पतीची पेन्शनही घेत होती.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. अनिता पाचपोर असे या महिलेचे नाव आहे. संबंधित सेक्स रॅकेट हे नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये सुरु होते.
पोलिसांनी या सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक सापळा रचला. पोलिसांनी एक खोटा ग्राहक त्याठिकाणी पाठवला. हा ग्राहक तिथे पोहोचल्यावर त्याच्या या सर्व गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर त्याने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी लगेचच त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. रेखा उर्फ अनिताला याआधीही अशाच प्रकारे पक़डण्यात आले होते. गरजू आणि गरीब मुलींना ती आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यांना सेक्स रॅकेटमध्ये भरती करायची.
ग्राहकांकडून मिळणाऱ्या रक्कमेपैकी निम्मी रक्कम रेखा देहव्यापार करणाऱ्या महिलांना द्यायची. रेखा ही मूळची अमरावतीची आहे. तिला पतीची पेन्शन मिळत असून तिला एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे.मुलगा आणि मुलीचे लग्न झाल्यामुळे ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ती घरी एकटीच राहत असल्यामुळे तिच्या घरीच हा सर्वप्रकार सुरु होता.
महत्वाच्या बातम्या-
मालकासाठी तीन गोळ्या खाल्ल्या, ४० किलोमीटर गाडी चालवून मालकाला रुग्णालयातही पोहोचवलं पण पुढे मात्र…
शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!
‘यापुढे महिलेवर हात उचलला तर हात तोडून हातात देईन’, पुण्यातील राड्यावरून सुप्रिया सुळे भडकल्या