Share

नाग-नागिणीची प्रेमकहाणी, नागिणीच्या मृत्युनंतर नाग तिच्याजवळच बसला फणा उभारून

माणसामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. व्यक्ती कोणताही असू तो नक्कीच कोणावर ना कोणवर तरी प्रेम करत असतो. माणसांसोबतच प्राण्यांमध्येही प्रेम अविभाज्य घटक असून प्राण्यांच्या प्रेमाचे अनेक किस्सेही आपल्याला पाहायला मिळतात. (nandgaon snake viral video)

आता अशाच प्राण्याच्या प्रेमाची कहाणी नाशिकच्या नांदगावातून समोरून आली आहे. कोब्रा जातीचं नाग-नागिणीचं जोडपं टाईल्स बनवणाऱ्या एका कारखान्याच्या अवतीभोवती फिरायचं. पण अशात अचानक त्या नागिणीचा मृत्यु झाला. त्यानंतर तिथे जे झालं ते हैराण करणारं होतं.

आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाला विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहाजवळ फणा उभारुन उभा होता. त्यानंतर तिथे असलेल्या कारखान्यातील लोकांनी हे बघितले आणि त्यानंतर त्यांनी सर्पमित्राला बोलावले. त्यानंतर खुप प्रयत्नानंतर नागाला पकडण्यात त्यांना यश आले. त्यांनी नागाला एका जंगलात सोडले आहे.

आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमध्ये नाग-नागिणीच्या प्रेमाची कहाणी बघितली आहे. अशात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडिओही अनेकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नागिणीचा मृतदेह पाहून नागाला विश्वासच बसत नव्हता. त्याला वाटतच नव्हते की, आपली प्रेयसी आपल्याला सोडून निघून गेली. त्यामुळे तो कित्येक वेळ तिथेच त्या मृतहेदाला बघत होता. यावेळी त्याने त्याचा फणाही काढलेला होता. तसेच तो तिथून हटण्यासही तयार नव्हता.

त्यानंतर हे सर्व तिथल्या कारखान्यातील कामगारांनी बघितले. त्यानंतर त्यांना वाटले की काही वेळ तो नाग थांबेन आणि त्यानंतर तो चालल्या जाईल. पण तो तिथेच बसलेला होता. त्यानंतर तिथल्या लोकांनी सर्पमित्राला बोलावून त्या नागाला पकडले आणि एका जंगलात त्याला सोडून आले.

महत्वाच्या बातम्या-
सामाजिक बंधने झुगारत बुलढाण्याच्या पठ्ठ्याने ठेवला नवा आदर्श, विधवा भावजयीसोबत केलं लग्न
चेन्नईचा ९७ धावांत उडवला खुर्दा; धडाकेबाज विजय मिळवत मुंबई इंडीयन्सने बदला घेतला
मोठा धक्का! मुंबईने ९७ धावांवरच चेन्नईला ऑलआऊट करत जिंकला सामना, चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं

राज्य ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now