औरंगाबादमध्ये रविवारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्या विधानावरुन आता राजकारण चांगलेच तापले आहे. (nana patole taunt bjp over governors controversial statement)
राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकार महाराष्ट्राचा अपमान करून आमच्या स्वाभिमानाला सतत आव्हान देत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
ट्विटमध्ये पटोले यांनी म्हंटले आहे की, ‘मोदी सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करून आमच्या स्वाभिमानाला सतत आव्हान देत आहेत. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मोदीजी, तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर या धाडसीपणाबद्दल जनतेला उत्तर द्यावेच लागेल.’
मोदी सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करून आमच्या स्वाभिमानाला सतत आव्हान देत आहेत. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मोदीजी, तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर या धाडसीपणाबद्दल जनतेला उत्तर द्यावेच लागेल. pic.twitter.com/kXg5lxSWgU
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 28, 2022
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींसह भाजपवर टीका केली आहे. भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत, असा टोला लगावतानाच त्या संदर्भात आता भाजपनेच भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच अशा प्रकारचं विधान इतर कुणी केलं असतं तर भाजपने एव्हाना रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. आम्हीच कसे महाराजांचे विचारक आणि वारसदार आहोत हे दाखवलं असतं. पण आता त्यांच्याच राज्यपालांनी हे विधान केल्याने महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपने ताबडतोब भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच आपले विधान मागे घ्यावे. असं केलं नाहीतर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहे. याचबरोबर सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण; वर्षा बंगल्यावर पार पडणार बैठक
‘अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर..’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले
मोठी बातमी! उपोषणामुळे संभाजीराजेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांना औषधे घेण्यास दिला नकार
‘पुष्पा’ च्या श्रीवल्ली गाण्यावर रितेश करत होता डान्स; जेनेलियाने हिमेश रेशमियाच्या गाण्याचा असा दिला तडका