Share

BJP : “शिंदे-फडणवीस गुजरातचे एजंट आहे, ते उद्योग प्रकल्पांसाठी मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील”

Eknath Shinde Devendra Fadanvis

nana patole criticize bjp shinde government  | राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. आता टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यामुळे त्यावरुनही विरोधी पक्ष सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नेते टीका करताना दिसून येत आहे.

आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकार हे गुजरातचे एजंट आहे. उद्योग प्रकल्पांसाठी ते मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राचे मोदी सरकारला गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेले शिंदे भाजप सरकार हे गुजरातचे एजंट झाले आहे. तसेच ते महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मागे आहे. याच्यामागे मोदींचा सुद्धा हात आहे. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवण्यास सुरुवात केली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच दुर्देवाने आधीचे फडणवीस आणि आताच्या ईडी सरकारने महाराष्ट्राचे हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर, येथील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. पण मोदी-शाह यांनी ईडीचा वापर करुन महाविकास सरकार पाडले. आता सरकार बदलल्यापासून तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री म्हणाले होते टाटा एअरबस महाराष्ट्रात येणार आहे. पण आता तेच म्हणताय की त्यात मागच्या सरकारची चुक होती. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहे की गुजरातचे? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Narayan Rane : चार आण्याच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो टाकणे पडले महागात
Pune : पुण्यातील राजकारणी इतके निर्लज्ज कसे? ‘त्या’ पार्टीनंतर नागरीकांचा संतप्त सवाल
Aditya Thackeray : ‘आपले मुख्यमंत्री दहीहंडी, गणपती मंडळ अन् फोडाफोडी सोडून दुसरं काहीच करत नाहीत’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now