Share

Congress : अंधेरी विधानसभा निवडणुकीत ५० ते ६० हजार मतांनी शिवसेनेला विजय मिळवून देणार, काँग्रेसचा निर्धार

Congress | शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. निवडणूक आयोगाने आता पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचवेळी विधानसभेच्या जागेवरील पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकारणाला उधाण आले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत.

अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाईल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. अनिल परब म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी विधानसभा जागा रिक्त झाली होती.

१३ ऑक्टोबर रोजी येथून शिवसेनेचे उमेदवार फॉर्म भरतील. दुसरीकडे ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं आमचं ठरलं होतं.

त्याप्रमाणे आम्ही या अंधेरी पुर्व पोट निवडणुकीला शिवसेनेला पाठिंबा देणार आहोत. याबरोबरच सोनिया गांधीशीही आम्ही चर्चा केली असून यावरूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष या निवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

ही जागा काँग्रेसची आहे. पण सेनेला आम्ही सहकार्य करू. काँग्रेस पुर्ण ताकदीने प्रचार करणार आणि सेनेला मदत करून निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला ५० ते ६० हजार मतांनी विजयी करू, असा निर्धार काँग्रेसने केला आहे.  दरम्यान, देशातील ६ राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

६ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोड, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर या जागांवर निवडणुका होणार आहेत. या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. नामांकनाची तारीख १४ ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ३ नोव्हेंबरला निवडणुका होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
Eknath shinde : धनुष्यबाण चिन्ह गमावल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज; म्हणाले, आमच्यावर अन्याय झाला….
Sharad pawar : ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी केली भाजप आणि शिंदे गटासोबत युती, समोर आली मोठी माहिती
Shivsena : याआधीही धगधगत्या मशालीने घडवला होता इतिहास; ‘मशाल’ चिन्हासोबत सेनेचं नातं जुनंच
Vinayak Raut : ‘एकनाथ शिंदेंबाबत २००३ मध्ये आम्ही ‘ती’ चूक केली, आज त्याचीच फळे भोगावी लागत आहेत’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now