सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने, त्याचे प्रमोशन कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर झाले नव्हते, तरीही तो खूप चर्चेत आहे.
या चित्रपटावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अनेक व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप भावूक झाले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण थिएटरमध्येच रडताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे.
तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे अनेक लोक आभार मानत आहे. या चित्रपटाचे देशभरात कौतूक होत आहे. तसेच काश्मिरी पंडितांचे दु:ख दाखवण्याचे धाडस केल्याने सगळीकडून अग्निहोत्री यांचे कौतूक केले आहे. राजकीय नेते आणि कलाकारही या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
आता या चित्रपटावरती प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा देश हिंदू आणि मुस्लिम दोघांचा आहे आणि त्यांनी एकत्र राहणे आवश्यक आहे आणि त्यांनी एकत्रच राहिले पाहिजे. दोन समाजात फूट पडणे ही चांगली गोष्ट नाहीये, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
नाना पाटेकर यांनी अजूनही हा चित्रपट बघितला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण अद्याप हा चित्रपट पाहिला नसून त्यावर भाष्य करू शकत नाही, पण प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटासारखाच पाहायला हवा, त्यातून तेढ निर्माण होईल असे काही करु नये. असेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर अनेकजण या चित्रपटाचे कौतूक करत आहे. तर अनेकांनी या चित्रपटावर टीकाही केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
चांगली बातमी! नाशिक फाटा ते राजगुरूनगर अंतर अवघ्या २० मिनीटांत होणार पुर्ण
अनुपम खेर यांचे काश्मिरबाबतचे ‘ते’ ट्विट पुन्हा व्हायरल, म्हणाले होते, हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी..
याला म्हणतात क्रेझ! रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘या’ चित्रपटाला मिळाली ४०० कोटींची ऑफर