काहीवेळा लोकांसोबत अशा घटना घडत असतात, ज्या खुपच धक्कादायक असतात तसेच त्या घटनांमुळे ते लोक चर्चेत येत असतात. आता असाच एक प्रकार एका महिलेसोबत घडला असून या घटनेमुळे ती चांगलीच चर्चत आली आहे. तिला तिच्या कारच्या डिक्कीमध्ये असे काही आढळून आले आहे की ते पाहून तिला धक्काच बसला आहे. (naked man in women car)
संबंधित घटना ही अमेरिकेतील आहे. एक महिलेला आपल्या कारमध्ये एक नग्न अवस्थेतील पुरुष आढळला आहे. आपल्या कारमध्ये नग्न व्यक्ती बघताच ती खुप घाबरुन गेली आणि त्यानंतर तिने पोलिसांना बोलवले आहे. नंतर असे तपासात असे लक्षात आले की गेल्या तीन दिवसांपासून महिलेच्या कारच्या डिक्कीमध्ये एक तरुण नग्न अवस्थेत होता.
महिलेने स्वतः तिच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. ‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचे नाव बेथनी कोकर आहे. बेथनीने सांगितले की, अलीकडे रात्री उशिरा घरी परतल्यानंतर तिने गेटजवळ कार उभी केली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला गाडीत माती आणि घाण दिसली.
बेथनीने सांगितले की, कारच्या आतील सीटवर चिखल होता. ती घाण पाहून कुणीतरी गाडीच्या आत रात्र काढल्याचा भास झाला. दरम्यान, बेथनीने गाडी बघण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा तिची नजर कारच्या डिक्कीकडे गेली, तेव्हा तर तिला धक्काच बसला.
https://twitter.com/GlobalBC/status/1489471563581775872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1489471563581775872%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Ftrending%2Fstory%2Fwoman-found-naked-man-sleeping-in-her-car-trunk-after-returned-home-late-night-tstf-1405775-2022-02-05
डिक्की उघडताच तिने बघितले की एक माणूस नग्न अवस्थेत झोपलेला दिसला. त्याच्या पायात माती लागलेली होती. या व्यक्तीमुळे तिची गाडी अस्वच्छ झाल्याची बाब महिलेला समजली. बेथनीने क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना बोलावले, त्यांनी अज्ञात व्यक्तीला कारच्या डिक्कीतून बाहेर काढले.
महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा विचारले की तो कारमध्ये का घुसला? तर तो पोपचा मुलगा आहे, गाडीत शिरून थेट देवाला भेटू शकतो, असे त्याने सांगितले. तपासाअंती ही व्यक्ती वेड्याच्या रुग्णालयातून पळून आलेला असल्याचे कळले. तो एक रुग्ण असून गेल्या तीन दिवसांपासून तो त्याच गाडीच्या डिक्कीत झोपलेला होता, असे त्याने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पोस्टाने घरी आलेले पाकीट उघडले आणि महिलेची झाली फसवणूक, पैशांचा लोभ पडला महागात
आता करोडपती झाले आहेत योगी आदित्यनाथ, वाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर किती पटीने वाढली त्यांची संपत्ती
पुण्यात जबर राडा..! शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर, व्हिडिओ तूफान व्हायरल