Share

nagraj manjule : सैराट बनवताना ‘या’ कारणामुळे खुपच घाबरले होते नागराज मंजुळे; स्वत:च केला अनेक गोष्टींचा खुलासा

nagraj manjule

nagraj manjule on sairat movie  | मराठीतील प्रसिद्ध  दिग्दर्शक नागराज मंजूळे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी नव्या कलाकारांना संधी देत फँड्री, सैराट, नाळ आणि झुंडसारखे चित्रपट तयार केले आहे. त्यांच्या या चित्रपटांनी अनेक रेकॉर्डही केले आहे.

मराठी सिनेमा रसातळाला गेला असताना नागराज मंजुळेंनी फँड्री, सैराटसारखे चित्रपट काढत बॉलिवूडच नाही तर संपुर्ण देशभराचे लक्ष वेधून घेतले. अशात नागराज मंजुळे यांनी एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. आता ते त्या मुलाखतीमुळे चर्चेत आले आहे.

मराठी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक हे दक्षिणात्य सिनेमे बघतात. तसेच त्याला प्राधान्य देताना दिसून येतात. त्यामुळे मराठी दिग्दर्शक तसे सिनेमे का बनवत नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी थेट मराठी प्रेक्षकांकडे बोट दाखवले आहे.

मी जेव्हा फँड्री काढला, तेव्हा मी असा एखादा चित्रपट बनवेल असं वाटलंही नव्हतं. आता घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट करताना देखील मी अशी एखादी भूमिका करेल असं वाटलं नव्हतं, असे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले मराठी भाषेतील जे चित्रपट असतात ते अर्थपूर्ण असतात. पण आपण मराठी प्रेक्षक फक्त मराठीच चित्रपट पाहतो असं नाही. आपण इतर भाषेतील चित्रपटही आवर्जून बघतो. त्याचाही फटका कुठे तरी मराठी चित्रपटांना बसतो. चांगले मराठी चित्रपट कधीकधी प्रेक्षकांमुळे राहतात.

दक्षिणात्य सिनेमांमध्ये ते विविध प्रयोग करत असतात. तिथल्या लोकांना ते आवडतातही. पण तसे प्रयोग मराठीत करतात येत नाही कारण मराठी प्रेक्षक. असे प्रयोग केले तर मनात एक भिती सुद्धा असते. प्रेक्षक कोणता विषय कोणत्या पद्धतीने आत्मसाद करेल हे सांगता येत नाही. प्रत्येक मराठी माणसाचा स्वभाव वेगळा आहे. त्यांच्या स्वभावानुसार ते चित्रपट पाहत असतात, असे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

तसेच मराठीत काही नवीन प्रयोग करायचं म्हटलं तर खुप भिती असते. सैराट करायचा होता, तेव्हाही माझ्या मनात खुप भिती होती. हा चित्रपट बनवायचा की नाही याचा मी खुपदा विचार केला. मी घाबरलो होतो. पण मी तो चित्रपट बनवला, असेही नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच ‘या’ अभिनेत्रीवर होत जिवापाड प्रेम पण…
rishabh pant : ऋषभ पंत दारु पिऊन गाडी चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी समोर आणले अपघाताचे सत्य
सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली होती, नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची गूढ पोस्ट, लिहिले- पुढच्या वेळी मी…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now