२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या यशाने दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांना यशाच्या शिखरावर नेले होता. आता त्यांनी ‘झुंड’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट केला आहे. (nagraj manjule halgi viral video)
सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत असून सगळीकडून नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे कौतूक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी ज्यापद्धतीने कलाकारांची निवड केली आहे, ते पाहून सगळेच हैराण होते, पण त्याच कलाकारांनी चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे.
नागराज मंजुळे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते जाताना दिसून येत आहे. तसेच त्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओही चर्चेत आहे. असे असताना आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुण्यात वाजवली हलगी🤩 pic.twitter.com/OVL8fmVBDN
— Tumchi Gosht (@TumchiGosht) March 4, 2022
व्हायरल व्हिडिओमध्ये नागराज मंजुळे स्वत: हलगी वाजवताना दिसत आहे. तसेच तिथे चित्रपटात काम करणारे कलाकार नाचताना दिसून येत आहे. चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळे आणि कलाकार आनंद साजरा करताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फ्रँड्रीतला जब्यासह झुंडमधले सर्वच बालकलाकार नाचताना दिसत आहे, तर त्यांचे चाहते फोटो काढताना दिसून येत आहे.
‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केले असून विजय बारसे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. हा मंजुळेंचा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात बिग बी फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपबाबत बोलताना नागराज मंजुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा चित्रपट करायचा विचार आला तेव्हा वाटलं हा चित्रपट का करायचा? मग जेव्हा मी याबद्दल संशोधन केले तेव्हा असे वाटले की ही माझी आणि माझ्यासारख्या लोकांची कथा आहे. या चित्रपटातून मी माझी कथाही सांगत आहे आणि विजय जींची कथाही पडद्यावर दाखवत आहे. चित्रपट लिहिताना माझ्या लक्षात आले की हा चित्रपट विजय जी आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची कथा आहे. त्यामुळे मी चित्रपटाला झुंड असे नाव दिले.
महत्वाच्या बातम्या-
५ वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून एकाचवेळी खाल्ल्या सेक्स पॉवरच्या ४ गोळ्या, पुढे घडला ‘हा’ विचित्र प्रकार
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा
टायगर 3 चा टिझर येताच शाहरुख-सलमानचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना भिडले, सुरू झाला ट्रेंड