Share

रुको जरा सबर करो! जेलमधून बाहेर येताच हिंदुस्तानी भाऊला बसला धक्का, नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस

दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याच्या विषयावरून विद्यार्थ्यांना भडकविल्यामुळे हिंदुस्तानी भाऊ (hindustani bhau) म्हणजेच विकास पाठकला 1 फेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. परंतु 17 फेब्रुवारी रोजी लगेच हिंदुस्तानी भाऊला जामिन मिळाला. मात्र जामिन मिळाला असला तरी हिंदुस्तानी भाऊला सुटकेचा श्र्वास मिळालेला नाही.

कारण जामिन मिळाल्यानंतर लगेच नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला हाजिर राहण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अडचणीत आणखीण वाढ झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी नागपूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला दिले आहेत.

दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असताना सरकारविरोधात विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर पोलिसांनी लावला आहे. हिंदुस्तानी भाऊने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणखीन तापले असल्याचे पोलिंसानी म्हटले.

याकारणामुळेच हिंदुस्तानी भाऊवर कारवाई करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय सुनावला आहे. परंतु या निर्णयावर विद्यार्थ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. मधल्या काळात या निर्णयाला विरोध दर्शवत विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील पुकारले होते.

दरम्यान या आंदोलनाच्या काळातच हिंदुस्तानी भाऊने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सर्वांना सांगितला होता. तसेच किती वाजेपर्यंत त्याठिकाणी आदोंलन करायचे हे देखील सांगितले होते. यानंतर आंदोलनातील वातावरण आणखीन तापले.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी देखील हिंदुस्तानी भाऊची बाजू घेत ते आमच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यावर झालेल्या कारवाईवर देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला अटक झाली होती.

महत्वाच्या बातम्या
मालेगावच्या उर्दुघराला कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव, महापालिकेत बहुमताने ठराव मंजूर
भन्नाट लव्ह स्टोरी: दोन मित्रांच्या बायका पडल्या एकमेकांच्या प्रेमात, नंतर नवऱ्यांना घटस्फोट देऊन केले लग्न
पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरू होतेय नवीन बुधवार पेठ, समोर आला मोठा घोटाळा
ऐतिहासिक निकाल! ४९ पैकी ३८ दोषींना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा, ११६३ साक्षीदारांना केले होते सादर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now